Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ येथे जवाहर विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

SGP 4503.JPG

 

भुसावळ, प्रतिनिधी | येथील जवाहर नवोदय विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा ‘स्नेहबंध मेळावा’ आज (दि.११) उत्साहात पार पडला. या मेळाव्यात सिंगापुरहून, पुणे, औरंगाबाद, बीड, जालना अशा ठिकाणाहून माजी विद्यार्थी उपस्थित होते.

या मेळाव्यात सिंगापुरहून, पुणे, औरंगाबाद, बीड, जालना अशा ठिकाणाहून माजी विद्यार्थी उपस्थित होते.  सुरवातीला दिप प्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ.आर.आर. खंडारे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यांनी प्रास्ताविकात स्वरचित कविता ‘नवोदय ज्ञान का मंदिर है’ सादर केली. त्यानंतर येथील माजी गटशिक्षणाधिकारी अनिल माळी यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्ह्यातील सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करुन दिला. संशोधक सचिन जैन यांनी नासा संदर्भात थोडक्यात माहिती सांगितली. कार्यक्रमाला ८० माजी विदयार्थ्याची उपस्थिती होती. त्यापैकी जे.के. महाजन हे सिंगापूर येथून आले होते. मेळाव्याचे सुत्रसंचालन सचिन पवार केले तर आभार उपप्राचार्य पी.आर. कोसे यांनी मानले. यावेळी सचिन जैन, डॉ.बाळासाहेब वाबळे, डॉ.विजय कुरकुरे, हरिष पाटील, रागिणी चौहान, मनिषा घुले, निलिमा पाटील, भारती पाटील, प्रशांत चौधरी, डॉ.समाधान आदी उपस्थित होते.

Exit mobile version