Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मका खरेदीतील गैरव्यवहाराची चौकशी करा- ए.टी. पाटील

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील मका खरेदी प्रकरणातल्या गैरव्यवहाराची चौकशी करून ही खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी माजी खासदार ए. टी. पाटील यांनी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, शेतकर्‍यांना पूर्वसूचना न देता मका खरेदी बंद केल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत अजूनही अनेक वाहने उभे आहेत. पाच-सात दिवस उलटूनही मका खरेदी होत नसल्याने दिवसला हजार रुपये याप्रमाणे शेतकर्‍यांना वाहनांचा भुर्दंड भरावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा संतप्त झाला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी खरेदी करण्यात आलेले मका खरेदीत शेतकरी संघ वतीने मोठा घोळ करण्यात आल्याच्या तक्रारी होत आहेत.

दरम्यान, शनिवारी माजी खासदार ए. टी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या विविध मागण्या व समस्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलना नंतर पोलीस निरीक्षक यांच्या कक्षात शेतकर्‍यांनी माजी खासदार ए टी पाटील यांच्याकडे बंद पडलेला मका खरेदीमुळे शेतकर्‍यांचे होत असेलेले नुकसान व त्रास बद्दल व्यथा व्यक्त केल्या. याची दखल घेत त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून बंद पडली मका खरेदी सुरू करण्या संदर्भात उपाय योजना करावी. मका खरेदी घोळची चौकशी करून सर्वसामान्य शेतकर्‍यांना न्याय द्यावा आणि खरेदी केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन सार्‍या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी शेतकर्‍यांसमोर केली.

जिल्हाधिकार्‍यांनी माजी खासदारांच्या मागणीला दुजोरा देऊन भेटीची ग्वाही दिली आहे. दरम्यान माजी खासदार पाटील यांनी प्रांत अधिकार्‍यांकडे तहसीलदार गवांदे यांची देखील तक्रार केली आहे. आंदोलन वेळी गवांदे हे उपस्थित नसल्याने याबाबत संताप व्यक्त करण्यात आला होता. आंदोलन संपल्यावर तहसीलदार गवांदे हे पोलीस निरीक्षक कक्षात आले होते. परिणामी माजी खासदार पाटील यांनी जाब विचारून मका खरेदी प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना केली आहे. यामुळे आता खरेदी चौकशी प्रकाराकडे तालुक्याचे लागून राहिले आहे. याप्रसंगी तालुकाध्यक्ष अतुल मोरे, माजी अध्यक्ष सुरेंद्र बोहरा, भाजप शिक्षक सेल तालुका अध्यक्ष जितेंद्र चौधरी, धीरज महाजन, रवींद्र पाटील, सचिन गुजराती यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version