Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर

मुंबई प्रतिनिधी । पंढरपुरच्या पोटनिवडणुकीनंतर देगलुरात होणार्‍या पोटनिवडणुकीत आपल्याला तिकिट मिळण्याची मागणी शिवसेनेच माजी आमदार सुभाष साबणे यांनी केली असून असे न झाल्यास भाजपमध्ये जाण्याचे संकेत त्यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पंढरपूर येथील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढूनही त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वारे पसरले आहेत. यातच आता काही दिवसांमध्ये देगलूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. नांदेडमधील देगलूर मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे गेल्या महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्वर्गीय अंतापूरकर यांच्या मुलाला पोटनिवडणुकीसाठी तयारी करण्यास सांगितलं आहे.

दुसरीकडे माजी आमदार सुभाष साबणे यांनी प्रसंगी उमेदवारीसाठी भाजपात जायची तयारी ठेवली आहे. सुभाष साबणे हे तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. 1999 ते 2009 या काळात ते मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. तर 2004 मध्ये ते देगलूरमधून विधानसभेवर निवडून गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते देगलूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र रावसाहेब अंतापूरकर यांनी साबणेंचा पराभव केला होता. देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती टाळायची असेल तर आपल्याला शिवसेनेने उमेदवारी द्यावी, अशी मागणी साबणे यांनी केली आहे.

सुभाष साबणे यांनी केली असून असे न झाल्यास भाजपमध्ये जाण्याचे संकेत त्यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.पंढरपूरमध्ये समाधान आवताडे यांना निवडून आणून भाजपने महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण केली असतांना देगलूरमध्ये पराभव झाल्यास राज्य सरकारची अजून नामुष्की होऊ शकते. यामुळे साबणे यांचा बंडाचा पवित्रा कसा थांबवावा हा प्रश्‍न शिवसेनेसमोर उभा राहिला आहे.

Exit mobile version