Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकीवरून पडल्याने माजी नगरसेवकाचा मृत्यू ; गुन्हा दाखल

पारोळा प्रतिनिधी । शहरातील माजी नगरसेवक रवींद्र चौधरी यांचा दुचाकीवरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना तीन दिवसापूर्वी घडली होती. त्याप्रकरणी आज पोलीस तापासावरून व फिर्यादवरून दुचाकी चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी नगरसेवक रवींद्र चौधरी हे शेतातून भैय्या सुदाम चौधरी यांच्या मोटार सायकल बसून घरी येत होते. धरणगाव रस्त्यावरील योगेश चौधरी यांच्या शेताजवळ कुत्रे आडवे आल्याने मोटारसायकल घसरून रवींद्र चौधरी खाली कोसळून गंभीर जखमी झाले. त्यांना कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. याबाबत शिवदास चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून व पोलिस तापसवरून मोटारसायकल चालक भैय्या चौधरी विरुद्ध आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अगोदर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. घटनेचा अधिक तपास हवालदार विनोद साळी हे करीत आहे.

 

Exit mobile version