Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन

नवी दिल्ली । भाजपचे मातब्बर नेते तथा माजी केंद्रीय संरक्षण मंत्री जसवंत सिंह यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनावर मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

माजी कॅबिनेट मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे संस्थापक सदस्य जसवंत सिंह (वय८२) यांचे निधन झाले आहे. ते गेल्या सहा महिन्यांपासून कोमात होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारमध्ये त्यांनी १९९६ ते २००४ दरम्यान त्यांनी संरक्षण, परराष्ट्र आणि वित्त यासारखी महत्वाची मंत्रालये समर्थपणे सांभाळली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून जसवंतसिंह यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यांनी लिहिले की, राजकारण आणि समाज या दृष्टिकोनातून सिंग यांच्या लक्षात राहतील. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अन्य मान्यवरांनीही त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

Exit mobile version