Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी आ. अरुण पाटील यांची अनिल चौधरींनी घेतली भेट

रावेर प्रतिनिधी । माजी आमदार अरुण पाटील यांची धामोडी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी भेट घेतली. यावेळी तब्बल दोन तास राजकीय विषयांवर चर्चा झाली आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत माजी आमदार अरुण पाटील यांचा एका मताने पराभव झाला. परंतु संपूर्ण तालुक्यात विजयी उमेदवारांपेक्षा पराभव झालेल्या माजी आमदार अरुण पाटलांची सर्वाधीक चर्चा आहे. रोज त्यांना भेटणा-यांची संख्या वाढत आहे. मराठा समाजातील सात्विक व शांत स्वभावाचे असलेले माजी आमदार अरुण पाटलांना विस्वास ठेवण्याची चांगलीच् किंमत मोजावी लागली आहे. त्यांच्या भेटी साठी आज प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांनी देखिल भेट घेतली. यावेळी रावेर तालुक्यातील आगामी निवडणुका व राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

 

Exit mobile version