Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ईव्हीएम बिघाडाचा फटका ; राज्यात 9 वाजेपर्यंत एक टक्काही मतदान नाही

voting maching

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. परंतु ठिकठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी मतदान यंत्रातील बिघाडमुळे तास दीड तासापासून मतदारांना रांगेत उभे राहावे लागल्याचे समोर आले आहे.

 

राज्यात अनेक ठिकाणी मतदानाला सुरुवात होताच अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. परभणीतील पालम तालुक्यात आरखेड येथे मशीन बिघाडामुळे एक तासा पासून मतदान बंद होते. पाथरी शहरातील जिल्हा परिषद शाळेवरील मतदान यंत्र बंद पडले. शहरातील मतदान केंद्र क्रमांक 215 व 235 वरील मतदान यंत्र बंद पडल्याने नवीन यंत्र बसविण्यात आले. या ठिकाणी जवळपास अर्धा तास मतदार खोळंबळे होते. मानवत तालुक्यातील सावरगाव येथील मतदान केंद्रावरील एक मशीन अर्धा तासापासून बंद होते.

Exit mobile version