Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतात सर्व छान चालले आहे- पंतप्रधान

ह्युस्टन वृत्तसंस्था । भारतात सर्व छान चालले असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील हाऊडी मोदी या कार्यक्रमात हजारो उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रंप यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

हाउडी मोदी कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी हजारो अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. प्रारंभी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आगमन झाले. मोदी यांनी ट्रम्प यांचे स्वागत करून ङ्गअब की बार ट्रम्प सरकारफ असा नारा दिला. मोदी यांनी भाषण केले. त्यानंतर ट्रम्प यांचे भाषण झाले. याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, ह्युस्टनमधील या मेळाव्याचे नाव हाउडी मोदी आहे. पण मोदी एकटा कोणी नाही. १३० कोटी भारतीयांच्या आदेशावर काम करणारा मी साधारण व्यक्ती आहे. यंदा भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१ कोटी जनतेने ऐतिहासिक कौल दिला. या निवडणुकीने भारतीय लोकशाहीची ताकद जगभर दाखवून दिली. ६१ कोटी मतदारांनी जगाला संदेश दिला, की भारतात सारे काही छान चालले आहे. ते पुढे म्हणाले की, त्याचबरोबर, दहशतवादाविरोधात आणि दहशतवादाला खतपाणी घालणार्‍यांच्या विरोधात निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे. या लढाईत अध्यक्ष ट्रम्प दहशतवादाविरोधात उभे आहेत. ज्यांना स्वतचा देश सांभाळता येत नाही, अशा मंडळींनी भारतद्वेषाला केंद्रस्थानी ठेवले. दहशतवादाचे समर्थन देणार्‍यांना सारे जग ओळखून आहे.

अमेरिक राष्ट्राध्यक्ष ट्रंप म्हणाले की, दोन्ही देश सुरक्षेवर एकत्रित काम करत असून भारत आणि अमेरिका इस्लामिक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत

Exit mobile version