Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतात सर्व काही ठीक, कसे काय ? – मुखर्जी

Sharmishta Mukherjee

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशात महागाई गगनाला पोहचली असून बेरोजगारी वाढली आहे. कांद्यापासून पेट्रोलच्या दरात प्रचंड वाढ झाली. याचबरोबर गुन्हेगारी वाढली आहे आणि मोदीजी म्हणतात, भारतात सर्व काही ठीक…कसे काय ?, असा प्रश्न माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या तसेच काँग्रेसच्या प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमेरिका दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात बोलताना सांगितले की, भारतात सर्व काही ठीक आहे. त्यावर शर्मिष्ठा मुखर्जी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. देशात सध्या महागाई वाढली आहे. गुन्हेगारी वाढली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. बेरोजगारीत प्रचंड वाढ होत आहे. देशात हे सर्व होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात सर्व काही ठीक आहे, असं कसं काय म्हणू शकतात?, असा सवाल मुखर्जी यांनी केला आहे. देशात सर्व काही ठीक आहे, असे म्हणून मोदी आपली जबाबदारी झटकू शकत नाही. गेल्या सात दिवसात पेट्रोलमध्ये सतत दरवाढ होत आहे. मोदी सरकारने पहिल्या कार्यकाळात एक्साईज ड्युटी वाढवली होती. दुसऱ्या कार्यकाळात पुन्हा वाढवल्याने ती खूप जास्त झाली आहे. सध्या ८ कोटी लोक बेरोजगार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. ऑटो क्षेत्रात मंदी आली आहे. कृषी क्षेत्रातही रोजगार कमी झाला आहे. असेही शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या.

Exit mobile version