Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यंदादेखील पावसाळयात खड्डेमय चिखलातील रस्ते

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नगर परिषदची निकृष्ट व बोगस विकास कामं यामुळे यंदा देखील शहरातील नवीन वसाहती मधील रहीवासी नागरीकांना पावसाळ्यात अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.

पावसाचा पाण्यामुळे धोकादायक बनलेले रस्ते व या रस्त्यांमुळे होणारे वाहनांचे अपघात अशी परिस्थिती निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले असुन, नागरीकांच्या या चिखलमय खड्डयातून प्रवास व वाहनांचे होणारे अपघात रहदारीची समस्या व अडचण टाळण्यासाठी या प्रश्नाकडे नगर परिषद प्रशासनाने तात्पुरती तरी पर्यायी व्यवस्था करावी. अशी अपेक्षा नवीन वसाहतीमधील नागरीक व्यक्त करीत आहे.

यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील फालक नगर, गंगानगर, पांडुरंग सराफ नगर, आयशा नगर, चॉद नगर या परिसरात मागील दोन ते अडीच वर्षात या नविन वसाहतीमध्ये शासनांच्या लाखो रुपयांच्या निधी खर्चातून रस्त्यांचे निकृष्ट प्रतिचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर गटारींचे आणि पुन्हा याच मार्गावरील रस्त्यावरील डांबरीकरणास खोदून निकृष्ट प्रतिची जलवाहीनी पाईपलाईन टाकण्यात आली.

अशा पद्धतीने नगर परिषदच्या माध्यमातून सर्वत्र गुणवत्ता शून्य असलेली निकृष्ट प्रतिची गोंधळलेली कामे करण्यात आली आहे. या नगर परिषदच्या दुर्लक्षित व भोंगळ कारभाराचा त्रास येणाऱ्या पावसाळ्यात देखील नागरीकांना होणार असून येत्या काही दिवसातच होवू घातलेल्या नगर परिषदच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत लोक प्रतिनिधीं यांना नागरीकांना या सर्व प्रश्नांचे उत्तर मात्र द्यावे लागणार आहे.

Exit mobile version