Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ उल्हास पाटील फिजिओथेरेपी महाविद्यालयात रेडक्रॉस शाखेची स्थापना

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सामाजिक हेतून स्थापन झालेल्या इंडियन रेडक्रॉस सोसा. च्या माध्यमातून रक्‍तदान,व्यसन जनजागृतीसारखे उपक्रमात फिजिओथेरेपी तज्ञांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचे प्रतिपादन रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी केले.

डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी महाविद्यालयात इंडियन रेडक्रॉस सोसा.च्या शाखेची स्थापना करण्यात आली यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना समाजातील वंचित घटकांना सुविधा पुरवणे गरजेचे आहे. या समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून काम करण्यासाठी हे व्यासपिठ खुलं करण्यात आले असून आता फिजिओथेरपी तज्ञांची कमतरता दुर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी त्यांच्या सोबत प्रशासकिय अधिकारी डॉ राजेश सुरडकर, जनसंपर्क अधिकारी उज्वलाताई वर्मा, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर हे उपस्थीत होते.

प्रास्ताविक जनसंपर्क अधिकारी उज्वलाताई यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार अनम विच्छी यांनी मानले.मान्यवरांचा सत्कार शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. यावेळी प्राध्यापक व कर्मचारी वृद सह विदयार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थीती होती.

Exit mobile version