Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोलसह तालुक्यात शिव जयंती उत्साहात साजरी

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरासह तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शहर व तालुक्यातील सर्व शाळा,महाविद्यालय,शासकीय कार्यालये,सामाजिक संस्थांतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शहरात शिव प्रेमींकडून मोटार सायकल रॅली काढण्यात आली.यावेळी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला शहरातील मान्यवरांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

याठिकाणी हजारो शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.शहरात सगळी कडे उत्साहाचे वातावरण होते.अनेक मोटार सायकलींवर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेले झेंडे लावुन युवक फिरत होते. शिवजयंती महोत्सवात आबालवृध्दांनी लावलेली हजेरी लक्षणीय ठरली. याच प्रमाणे तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये शिवजयंतीचा उत्साह दिसून आला.

Exit mobile version