एरंडोलच्या ओम त्रिवेदीचे जेईईमध्ये यश

एरंडोल प्रतिनिधी । येथील आकाश ओम त्रिवेदी या विद्यार्थ्याने अतिशय प्रतिष्ठेच्या व खडतर मानल्या जाणार्‍या जेईई अ‍ॅडव्हान्स्ड या प्रवेश परिक्षेत देशातून २२६व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले आहे.

आकाश हा एरंडोल येथील प्रसिद्ध वकील अ‍ॅड. ओम त्रिवेदी यांचा मुलगा आहे. आकाशने सातवीत असताना माध्यमिक शालांत शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रात नववा क्रमांक मिळवला होता. तर आठवीत क्लासमेट स्पेलबी या राष्ट्रीय परीक्षेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. हा शो डिस्कवरी चॅनेलविरुद्ध जगभर प्रसारित झाला होता. ओम हा दहावीत केंद्र शासनातर्फे झालेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत ३० वा क्रमांक मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरला होता. अकरावीत किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेच्या या परीक्षेत अंतिम फेरीत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीस पात्र ठरला होता. यानंतर आता त्याने जेईई प्रवेश परिक्षेत यश संपादन केले आहे.

आकाशने भारतातच राहून संशोधन क्षेत्रात काम करीत देशाची सेवा करण्याचा संकल्प केला आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Protected Content