Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकोप्याने कामाला लागा : आ. चिमणराव पाटील यांचे आवाहन

एरंडोल प्रतिनिधी । येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गैरसमज दूर करून एकोप्याने कामाला लागलावे असे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी केली. ते येथील शिवसेना कार्यालयातील बैठकीत बोलत होते.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना कार्यालयात पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकील आमदार चिमणराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लोकांच्या समस्या जाणून त्या मार्गी लावण्याचे नियोजन करा, पक्ष संघटन मजबूत करा, पक्षाला तडा जाईल असे कार्य करू नका. आपसातले राजकारण, समज-गैरसमज दूर करुन एकजुटीने कामाला लागून जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर भगवा झेंडा फडकावा असे आवाहनही केले. तसेच फक्त एखादा वॉर्ड अविरोध झाला तरी त्या वॉर्डासाठी पाच लाखांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा देखील आमदार पाटील यांनी केली.

या वेळी विधानसभा संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, पारोळा बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिमंत पाटील, पं.स. उपसभापती अनिल महाजन, युवा सेना तालुका प्रमुख बबलू पाटील, आनंदा चौधरी, गजानन पाटील, समन्वयक नीलेश पाटील, उपतालुकाप्रमुख रवींद्र चौधरी, संजय पाटील, अतुल महाजन, चिंतामण पाटील, राजेंद्र ठाकूर, माजी सभापती गबाजी पाटील, दत्तू पाटील, बापू पाटील, बाजार समिती संचालक गजानन पाटील, कासोदा शहर प्रमुख महेश पांडे, अमोल भोई, रमेश जमादार, संदीप मराठे, धनराज अहिरे, रावसाहेब पाटील, उपसरपंच रवींद्र पवार, उत्राण सरपंच संतोष कोळी, वैजनाथ सरपंच नाना पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Exit mobile version