Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रांताधिकार्‍यांनी घेतला कोविडच्या उपाययोजनांचा आढावा

एरंडोल प्रतिनिधी । येथील प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी कोविडच्या उपचारासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजनांना आढावा घेऊन संबंधीतांना आवश्यक ते निर्देश दिलेत.

एरंडोल शहरासह तालुक्यात अलीकडच्या काळात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. या पार्श्‍वभूमिवर, येथील प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या वेळी तहसीलदार अर्चना खेतमाळीस, पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फिरोज शेख, वैद्यकीय अधीक्षक कैलास पाटील उपस्थित होते.

या बैठकीत ग्रामीण रुग्णालयात केवळ २ डॉक्टर असून कोविड सेंटर येथे ४६ रुग्ण व ग्रामीण रुग्णालयाच्या ऑक्सिजन वॉर्डमध्ये २४ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांसाठी कृष्णा हॉटेलवरून उत्तम जेवण मिळत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. पालिकेचे पथक वेळोवेळी साफसफाई करत असल्याचे या प्रसंगी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, कोविड काळात ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांना देत असलेल्या सेवा व सुविधांबाबत रुग्णांच्या परिवारातील सदस्य समाधान व्यक्त करत असल्याची माहिती देण्यात आली.

प्रांताधिकारी म्हणाले की, वैद्यकीय कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्यामुळे पालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांचे स्वॅब घेत आहेत. सफाई कर्मचारी मृत झालेल्या रुग्णाचे अंत्यसंस्कार करत आहे. कमी कर्मचारी असतांना ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व नर्स, कर्मचारी हे दिवसरात्र परिश्रम करून रुग्णांची सेवा करत आहे.

ऑक्सिजन वॉर्डमध्ये २४ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांसाठी कृष्णा हॉटेलवरून उत्तम जेवण मिळत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. पालिकेचे पथक वेळोवेळी साफसफाई करत असल्याचे या प्रसंगी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, कोविड काळात ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांना देत असलेल्या सेवा व सुविधांबाबत रुग्णांच्या परिवारातील सदस्य समाधान व्यक्त करत आहेत, असे या वेळी सांगण्यात आले.

Exit mobile version