पर्यावरण मंत्री ठाकरे यांची चौकशी होणार- सोमय्या

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राज्यात भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सूरु असून भाजपचे किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे खा. संजय राऊत याचा एकमेकांवर आरोप करीत आहेत. त्यातच आता महाविकास आघाडीतील पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे यांची मनी लॉड्रिंग प्रकरणी चौकशी होणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी बोलतांना सांगितले कि, आ. प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरु आहे. संजय राऊत, मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्ता जप्त झाल्या, तसेच भावना गवळी यांच्यावर कारवाई झाली, रश्मी ठाकरेंच्या १९ बंगल्याच्या संदर्भात तपास सुरु आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्री जेल मध्ये आहेत. यांची प्रकरणे बाहेर काढली त्याचा परिणाम हा आहे.

आता ७ कोटींच्या मनी लॉड्रिंग प्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा नंबर आहे. त्यांनाही चौकशीला सामोरे जावेच लागणार असून आतापर्यत २६ आरोप ठाकरे सरकारवर केले आहेत. त्यात ८ प्रकरणात महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला कंत्राट रद्दच नाही तर त्याचा परतावा देखील केला करावा लागला आहे. उर्वरित प्रकरणाची चौकशी कारवाई सुरु आहे लवकरच १०० कोटींचा शौचालय घोटाळा बाहेर येणार आणि त्याची चौकशी होणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

 

 

Protected Content