Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धनाजी नाना महाविद्यालयात ‘केळी उत्पादन तंत्रज्ञान’ कार्यशाळा उत्साहात

यावल प्रतिनिधी । कृषी विज्ञान केंद्र, पाल, अपेडा, कार्यालय मुंबई व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील धनाजी नाना महाविद्यालयात एक दिवसीय निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर नुकतीच कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार शिरिष मधुकरराव चौधरी (आमदार,यावल/रावेर विधानसभा क्षेत्र) उपस्थित होते शेतकऱ्यांना संबोधित करताना केळी पिकाचे मूल्यवर्धन करून अधिक उत्पन्न प्राप्त करावे असे विचार त्यांनी आपल्या मार्गदर्शनात मांडले. उद्घाटन समारोहात कृषी विज्ञान केंद्रा तर्फे आधुनिक केळी लागवड तंत्रज्ञान या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.तांत्रिक चर्चासत्रात डॉ. के बी पाटील (केळी तज्ञ व उपाध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टिम) यांनी केळी लागवडी संदर्भात निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन केले.

तसेच डॉ. सी डी बडगुजर (प्रमुख शास्त्रज्ञ, केळी संशोधन केंद्र, जळगाव) यांनी निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर नाविन्यपूर्ण बाबी सह तंत्रज्ञानाची माहिती दिली या कार्यक्रमास अपीडाचे क्षेत्र अधिकारी लोकेश गौतम यांनी अपेडा संदर्भात निर्यातक्षम केळी उत्पादन विषयीचे भूमिका व महत्व विशद केले त्याचप्रमाणे निखील कुलकर्णी (व्यवस्थापक इंक्युबॅशन सेंटर कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव) यांनी कृषी क्षेत्रातील स्टार्ट बाबत मार्गदर्शन केले.

किरण जाधव यांनी विविध योजनांविषयी माहिती दिली तसेच केळी पिकापासून प्रक्रिया करावे असे आवाहन केले  संभाजी ठाकूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय जळगाव यांनी विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी अधिक उत्पादना करता शासकीय योजनांची मदत घ्यावी व उत्पन्न वाढवावे असे निवेदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश महाजन (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख प्रभारी कृषी विज्ञान केंद्र पाल) यांनी केले. या कार्यशाळेस अजित पाटील(सचिव,सातपुडा विकास मंडळ,पाल), एम ए चौधरी (प्रकल्प संचालक,आत्मा), प्रभात चौधरी (सचिव,जनता शिक्षण मंडळ,खिरोदा), कुर्बान तडवी (उपविभागीय कृषी अधिकारी, जळगांव), सनी दमानिया (केळी निर्यातदार), परिसरातील केळी उत्पादक व  प्रगतिशील युवा शेतकरी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  वैभव पाटील यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. धीरज नेहेते(शास्त्रज्ञ) शरद वाणी व कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे आभार अतुल पाटील(शास्त्रज्ञ) यांनी व्यक्त केले.

 

Exit mobile version