Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उर्जामंत्री ना. राऊत उद्या जिल्हा दौऱ्यावर

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – राज्याचे उर्जामंत्री ना. नितीन राऊत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून गुरुवार सायंकाळी जिल्ह्यात दाखल होत आहेत. शुक्रवारी होणाऱ्या जिल्ह्यातील विविध कार्यक्रमाना ना. राऊत उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवारी १३ रोजी सकाळी कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि जळगाव रेल्वे स्थानक परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास राज्याचे उर्जामंत्री माल्यार्पण करतील.  तेथून चिंचाटी तालुका रावेर येथे  ३३/११ केव्हि उपकेंद्राचे  भूमिपूजन कार्यक्रम,  मोर प्रकल्प ठिकाणी नियोजित सौर उर्जा प्रकल्प स्थळाची पाहणी करणार आहेत.

तेथून भुसावळ येथे दुपारी २ वाजता दीपनगर औष्णिक प्रकल्प ठिकाणी महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, महाउर्जा विद्युत विभाग आणि जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच मलकापूर आणि बुलढाणा विभागाची आढावा बैठक औष्णिक विद्युत केंद्र सभागृहात होणार आहे.  त्याच ठिकाणी दुपारी ४ वाजताडॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम आणि अनु.जाती विभाग काँग्रेस पक्ष जळगाव यांच्याशी सुसंवाद साधणार आहेत. त्यानंतर भुसावळ येथील ६६०, ५०० आणि २०० मेगावॉट प्रकल्पाची पाहणी करतील. त्यानंतर कलानगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम अध्यक्षांची भेट, त्यानतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड (डी.एस.हायस्कूल मैदान) येथील भिमोत्सव २०२२ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version