Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

झोमॅटो विरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

zomato

 

मुंबई प्रतिनिधी । आठवडाभरापूर्वीच एका ग्राहकाला दुसऱ्य़ा समाजाचा डिलिव्हरी बॉय नको होता. म्हणून या ग्राहकाने ऑर्डर रद्द केल्याचा वाद संपत नाही. तोपर्यंत झोमॅटोने नव्या वादात सापडला आहे. पश्चिम बंगालमध्ये झोमॅटोविरोधात त्यांचे डिलिव्हरी बॉयनीच गेले आठवडाभरापासून आंदोलन छेडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांच्या दोन मागण्या आहेत. पहिली अशी की, कंपनीने कर्मचाऱ्यांच्या धार्मिक भावनांशी कोणत्याही प्रकारचा खेळ करू नये. दुसरी पगारवाढीची आहे. याबाबत य़ा कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, मात्र त्यांच्याकडून अद्य़ाप कोणताही प्रतिसाद आलेला नाही, असे या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. गेल्या महिन्यात 31 जुलैला डिलीव्हरी बॉय हिंदू नसल्याने ऑर्डर रद्द करणाऱ्या ग्राहकाला झोमॅटोनं सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे झोमॅटोचे संस्थापक दिपिंदर गोयल यांनीही ट्विट करत आपल्याला आयडिया ऑफ इंडियाचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं. आम्ही व्यवसाय करताना मूल्यं पाळतो, अशी भावना त्यांनी ट्विटद्वारे व्यक्त केली आहे.

Exit mobile version