Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरपावली ग्रामपंचायत गैरव्यवहारातील दोषींवर कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा

 

 

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायती अंतर्गत चौदाव्या वित्त आयोगाच्या उपलब्ध झालेल्या निधीतून  लाखों रूपयांचा अपहार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मुनाफ जुम्मा तडवी यांनी केला असून या अपहाराची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र दिन अर्थात  १ मे पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी या प्रकरणाची चौकशी करण्यास हेतुपुरस्पर टाळाटाळ करीत असल्याचा संशय तक्रारकर्यत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.  ग्राम विस्तार अधिकारी व ग्रामसेवक दोघेही सपकाळे असल्याने तर सदरील प्रकरण चौकशी होण्यास टाळाटाळ व विलंब तर होत नाही ना अशा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.  

कोऱपावली ग्रामपंचायतच्या माध्यमातुन मागील पंचवार्षिक कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात चौदाव्या वित्त आयोगाचा निधी तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील गावाच्या सर्वांगीण विकास कामासाठी आरखड्यानुसार  निधी उपलब्ध झाला होता.  या  निधीतून लाखो रुपयांचा अपहार माजी सरपंच सौ.कोळंबे व ग्रामसेवक प्रवीण सपकाळे यांनी केल्याचे दिसून येते असल्याचे मुनाफ जुम्मा तडवी यांनी  तक्रार केली आहे.  ती पुढीलप्रमाणे : गावातील विविध ठिकाणी वाड्यातील पेव्हरब्लॉक ,स्मशानभूमीचे सुशोभीकरण करणे ,जिल्हा परिषदच्या मराठी व उर्दू शाळेत खेळणी साहित्य पुरविणे, अंगणवाडी साहित्य व दुरूस्ती, शेती अंतर्गत रस्ता दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली बोगस कामे दाखविले, गावहाळ दुरुस्ती सार्वजनिक शौचालय बांधकाम  यांसारखी बोगस कामें करून व शासनाची दिशाभूल करून लाखो रूपयांचा अपहार झाल्याचे चित्र दिसून येते.  ग्राम सेवक यांनी शेवटच्या टप्प्यात २९/२ / २०२०ते २८ / ८ / २०२० पर्यंतच्या मिटींग काही कारणांस्तव तहकूब करून पुढे ढकलण्यात आल्याचे सांगून त्यावर उपस्थित सदस्य व काही ग्रामस्थांच्या अर्धवटच सह्या करून त्याचा गैरवापर करत सदस्यांना अंधारातठेऊन सरपंच व ग्रामसेवक यांनी वरील कामे दाखवून कुणाच्या संगनमताने खोटी बिले पास करून हा अपहार केला यामागे कोणत्या मोठया अधिकाऱ्यांचे संगनमत झाले,तरी वर दिलेल्या माहितीनुसार कामांची सखोल चौकशी केल्यास सत्य परिस्थिती उघड होण्याची शक्यता आहे, सदरील अपहार झाल्याच्या चौकशीचे निवेदन मुनाफ जुम्मा तडवी यांनी यावल पंचायत समितीत देण्यात आले आहे. तरी संबंधीत प्रकरणाची चौकशी करून दोषींवर ग्रामपंचायतअधिनियम ३९ (  १ )  प्रमाणे कायदेशीर कारवाई न झाल्यास आपण १ मे पासुन आमरण उपोषणास बसणार  असल्याचा  इशारा मुनाफ जुम्मा तडवी यांनी दिला आहे

Exit mobile version