Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये एलिसने नवीन विक्रम नोंदविला

EAnKi6fXoAAg8zY

नवी दिल्ली प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिस पॅरीने 1 हजार धावांसह 100 विकेट्स घेत नवीन विक्रम नोंदविला आहे.

एलिसने (वय-28) 104 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहे. यामध्ये तिने 1 हजार 5 धावांसह 103 विकेट्स घेतल्या आहेत. तिने नोव्हेंबरमधील वर्ल्ड टी-20 च्या अंतिम सामन्यातच 100 विकेट्स मिळवल्या होत्या. त्यानंतर रविवारी दि.28 जुलै रोजी झालेल्या इंग्लंडच्या टी-20 सामन्यात तिने 1 हजार धावांचा टप्पा ओलांडून विक्रमाची नोंद केली आहे. पुरुष आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वात जास्त धावा भारताचा फलंदाज रोहित शर्माने केल्या आहेत. त्याने 94 सामन्यात 2 हजार 331 धावा तर, न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिलने 2 हजार 272 आणि विराट कोहलीने 2 हजार 263 धावा केल्या आहे. आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये शाहिद आफ्रिदी 99 सामन्यांत 98 विकेट्ससह सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. तर श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा 97 विकेट्स घेत दुसऱ्या स्थानावर आहे.

याचबरोबर, पुरुष आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने 1 हजार 414 धावांसह 98 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने 1 हजार 471 धावा करत 88 विकेट्ससह दुसऱ्या स्थान मिळवले होते.

Exit mobile version