Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘शहर प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी इलेक्ट्रॉनिक वाहनाचा वापर करावा’ – मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले.

जामनेर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहर प्रदूषण मुक्त करण्यासाठी व प्रदूषणामुळे दुष्परिणामापासून बचाव करण्यासाठी आता नागरिकांनी जास्तीत जास्त विद्युत उपक्रमांवर चालणाऱ्या वाहनाचा वापर करावा असे आवाहन नगरपालिका मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले यांनी कार्यक्रमात बोलतांना केले.

जामनेर नगरपालिका व राजनकर एंटरप्राइजेसच्या वतीने ‘माझी वसुंधरा २०२२ अभियाना’अंतर्गत नगरपालिकासमोर विद्युत उपकरणावर चालणारे दुचाकी वाहनांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. यावेळी नागरिकांना विद्युत उपकरणाचा फायदा होत असून या दुचाकी वाहनामुळे स्वतःचा पैसा वाचतो. त्याचबरोबर शहरात प्रदूषण होत नाही. यामुळे अनेक फायदा होत असून आपण शहरवासीयांनी जास्तीत जास्त विद्युत उपकरणावर चालणारी वाहने वापरावी असे या प्रदर्शनाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील, नगरसेवक खलील भांजा, नगरपालिकेचे दुर्गे सोनवणे, गजानन माळी, राजनकर इंटरप्राईजेसचे संचालक अक्षय राजनकर, नितीन राजनकर, सोनू माळी आदी उपस्थित होते.

Exit mobile version