Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कार्यकारी अभियंत्यांच्या आश्वासनानंतर चाळीसगावात वीज ग्राहकांचे आंदोलन मागे

aandolan samapt

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरात गेल्या महिनाभरापासून वीज वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना सूचना न देता मनमानी पद्धतीने रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर बसवण्यात येत होते या मीटर चे जादा बिल येत असल्याने त्या विरोधात रयत सेना व युनिटी क्लबच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर कालपासून रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. आज (दि. ७) या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर थाळीनाद आंदोलन केल्यावर वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी नवीन वीजमीटर लावण्याला सात दिवस स्थगिती दिली असून तक्रारींचे निराकरण करून व शंकांचे समाधान झाल्यावरच नवे मीटर बसवले जातील, असे लेखी आश्वासन त्यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

यावेळी कार्यकारी अभियंता श्री. शेंडगे यांनी लेखी पत्रात म्हटले आहे की, शहरातील नवीन वीज मीटर बाबत तक्रारीचे निराकरण करण्यासाठी वीज मीटर दि. ७ ते १४ ऑगस्ट दरम्यान विज मीटर कुठलेही शुल्क न घेता तपासून ग्राहकांच्या शंकेचे समाधान करून दिले जाईल. तो पर्यंत सात दिवस नवीन विज मीटर बसवण्याची मोहिम बंद ठेवण्यात येणार आहे या लेखी आश्‍वासनानंतर तहसीलदार अमोल मोरे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, जनआंदोलनाचे प्रा गौतम निकम, नगरसेवक रामचंद्र जाधव ,भगवान राजपूत, संजय पाटील, कॉंग्रेसचे अनिल निकम यांच्या उपस्थित आंदोलन स्थगित करण्यात आले दरम्यान रेडिओ फ्रिक्वेन्सी नवीन वीज मीटर संदर्भात ज्या ग्राहकांना जादा बिले आले असेल किंवा तक्रार असेल त्यांनी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार मो. ९८२२७४१४२६ , युनिटी क्लबचे सप्निल कोतकर मो. ९८५००६६८४४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आज आंदोलनस्थळी माजी आमदार राजीव देशमुख, युवा नेते मंगेश चव्हाण, जि.प. सदस्य शशिकांत साळुंखे, प.स. उपसभापती संजय पाटील, मा. जिल्हा परिषद सदस्य मंगेश चव्हाण, प्रभाकर जाधव, किशोर पाटील, मा.प.स. सदस्य दिनेश बोरसे, शेषराव पाटील, विजय जाधव, प स सदस्य अजय पाटील, नगरसेवक सुरेश स्वार, बाजार समिती धर्मा काळे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष श्याम देशमुख, खुशाल पाटील, सचिन स्वार, अरुण पाटील, छोटू पाटील, बबन पवार, जितेंद्र राजपूत, राहुल पाटील, दिनकर पाटील, प्रभाकर चौधरी, सतीश पाटे, पप्पू पाटील, भाऊसाहेब पाटील, भैय्यासाहेब पाटील, हरी नाना जाधव, देवळीचे छगन जाधव, प्रशांत राजपूत, सागर नागणे, संजय ठाकरे, विजय पाटील, गौतम निकम, मुकुंद पाटील, आकाश पोळ, प्रभाकर पारवे, लहु बाबर, सुनील जाधव यांच्यासह विजग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनात रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार ,प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे अल्लाउद्दीन शेख, जिल्हा अध्यक्ष संजय कापसे, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत कदम, स्वप्नील गायकवाड ,ज्ञानेश्वर कोल्हे ,तालुका उपाध्यक्ष विलास मराठे, मुकुंद पवार ,समाधान मांडोळे, शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे,मॉंटी शेख , तर सुनिल पवार, जयदीप पवार, सागर पाटील, भाऊसाहेब सोमवंशी ,छोटू अहिरे, अभिमन्यू महाजन ,विकास बागड, देवेंद्र पाटील, गणेश देशमुख, गोपी कुमावत, शहरात सपकाळे, भगवान काटकर, राजू कुमावत, गोकुळ गवळी, गणेश बारवकर, दत्ता गवळी, दत्ता कोष्टी, गोरख साळुंखे, विजय जगताप, उदय पाटील, अक्षय कुंभार, रोहित जगताप, पवन पाटील, वैभव पाटील, मोहसिन शेख तर युनिटी क्लबचे स्वप्नील कोतकर, मनिष मेहता, स्वप्नील धामणे, निशांत पाठक, राकेश राखुंडे, संदीप मोरे आदींनी सहभाग घेतला होता.

Exit mobile version