Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिपावलीच्या सुट्ट्यांमध्येही वीज बिल भरणा केंद्र सुरू !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ११ व १२ नोव्हेंबर २०२३ रोजी शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या आहेत. त्यास जोडूनच दीपावलीच्या काळात 13 ते 14 नोव्हेंबर दरम्यानही सुट्ट्या आहेत.

त्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून जळगांव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील महावितरणची सर्व वीज बिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी दिले आहेत. या शिवाय, महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थाळावर जाऊन view and pay bill वरही ग्राहकांना वीजबिल भरता येईल. महावितरण मोबाईल ॲपसह इतर सर्वच ऑनलाईन माध्यमातून घरबसल्या ग्राहकांना त्यांची वीजदेयके ऑनलाईन भरता येतील.

Exit mobile version