Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इलेक्ट्रिक दुकानदाराची मोपेड दुचाकी चोरट्यांनी लांबवली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गुड्डू राजा नगरातून घरासमोर उभी इलेक्ट्रिक दुकानदाराची ४० हजारांची मोपेड दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी बुधवार १२ जुलै रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील गुड्डू राजा नगरात महावीर संपतलाल पिन्चा हे वास्तव्यास आहेत. त्यांचे इलेक्ट्रॉनिकचे दुकान असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह भागवतात. 10 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता नेहमीप्रमाणे घरासमोर पार्किंग केली होती. दुसऱ्या दिवशी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास महावीर पिन्चा यांना कामानिमित्त बाहेर जायचे असल्याने दुचाकी ज्या ठिकाणी उभी केली होती त्या ठिकाणी आले. या ठिकाणी उभे केलेली दुचाकी मिळून आले नाही सर्वत्र शोध घेतला मात्र दुचाकी सापडले नाही अखेर आज बुधवारी महावीर पिन्चा यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीवरून चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी सोडून दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Exit mobile version