मविआ सरकार अस्थिर करण्यासाठीच निवडणूक लादली- खा. राऊत

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | गेल्या वेळी कॉंग्रेसचा उमेदवार पडला होता, परंतु आता तसे होणार नाही, आमचा दुसरा उमेदवारही निवडून येत सहावी जागा जिंकणार असा दावा करीत मविआ सरकार अस्थिर करण्यासाठीच भाजपाने निवडणूक लादली असल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते तथा खा.संजय राऊत यांनी केला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत सहा जागांसाठी ७ उमेदवार आहेत. निवडणुका आल्या कि बैठका होत असतातच. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच आज सकाळी महाविकास आघाडीतील नेते विधान सभेचे विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते. आणि गेल्या वेळी कॉंग्रेसचा उमेदवार पडला होता, परंतु त्यावेळी गुप्त मतदान होते, आता परिस्थिती तशी नाही पक्ष प्रतोदांना मत दाखवून द्यावे लागते.

कॉंग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांची उमेदवारी लादल्यामुळे कॉंगेसमध्ये नाराजी असून नाराज आमदार फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे इम्रान प्रतापगढीना काहीही झाले तरी निवडून आणण्यासाठी शिवसेनेवर दबाव आणला जात होता. त्यासाठी भाजपाने त्यांचा तिसरा उमेदवार मागे घ्यावा विधानपरिषदेत जागा देऊ असा प्रस्ताव देत महाविकास आघाडीचे नेतेदेखील फडणवीसांची भेट घेण्यासाठी गेले होते. परंतु भाजपनेच तुमचा उमेदवार मागे घ्या आम्ही विधान परिषद तुमच्यासाठी सोडतो असे म्हणत प्रस्ताव दिला. परंतु  हेतू पुरस्सर मविआ सरकार अस्थिर करण्यासाठीच भाजपाने निवडणूक लादली असा आरोप खा. राऊत यांनी केला आहे.

Protected Content