Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे निवडणूक नियोजन प्रशिक्षण

WhatsApp Image 2019 09 08 at 4.20.29 PM

जळगाव, प्रतिनिधी | कॉंग्रेसतर्फे प्रत्येक ६ बुथसाठी एक सेक्टर समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना मदतीसाठी प्रत्येकी २ जण यांचे प्रशिक्षण आज रविवार ८ सप्टेंबर रोजी कॉंग्रेस भवनात आयोजित करण्यात आले होते.

जळगाव शहर विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना निवडणूक नियोजन प्रशिक्षण प्रदेशचे सरचिटणिस विनायकराव देशमुख यांनी दिले. हे प्रशिक्षण श्री. देशमुख यांनी मतदार यादी, व्हीडीयेज, पॉवर पॉइंट प्रझेंटेशनद्वारे केले. प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केले. त्यांनी नियुक्त पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या व अपेक्षित भूमिका विषद केली. प्रशिक्षणात कॉंग्रेसची विचारधारा, देशाच्या विकासात कॉंग्रेसचे योगदान, भाजपाचे घोटाळे तसेच विधानसभास्तरीय जाहीरनामाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश सचिव डी.जी. पाटील, ग्रामिण जिल्हाध्यक्ष अॅड. संदिप पाटील,माजी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. सलिम पटेल ,उदय पाटील, ब्लॉक अध्यक्ष नदीम काझी यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्यासोबत महिला काँग्रेसच्या सुलोचना वाघ, शितल कोळी, अमिना तडवी, स्वामी रेणापूरकर, राजस कोतवाल, देवेंद्र मराठे, युवक काँग्रेसचे हितेश पाटील, मुजीब पटेल, डॉ. धनराज चौधरी, दिपक बाविस्कर, अॅड. भरत गुजर, जाकिर बागवान, अॅड. संतोष कोळी, पी. जी. पाटील, राजेश मंडोरे, जमिल शेख आदी उपस्थित होते.

Exit mobile version