Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजप कामगार मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर कुमार सिरामे याची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीवर सदस्यपदी जळगाव शहरातील  कुमार सिरामे याची नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्तीचे पत्र भाजपच्या  मुख्यकार्यालय मुबंईत कुमार सिरामे याना प्रदेश  अध्यक्ष विजय हरगूडे व माजीप्रदेश अध्यक्ष गणेश ताठे व विक्रम नागरे याच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी कुमार सिरामे यानी संघटीत व असंघटीत कामगारासाठी काम करत असल्याचे सांगितले. तसेच मागिल तिन वर्ष जळगांव भाजप कामगार मोर्चाचे अध्यक्षपद कुमार सिरामे सांभाळत होते.

कामगाराच्या न्यायहक्कासाठी ते योगदान देत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत प्रदेश सदस्यपदी त्याची निवड करण्यात आली आहे. भाजप कामगार मोर्चाच्या माध्यमातून सर्व सामान्य कामगार वर्गाला विविध शासकीय योजनाद्वारे न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यानी निवडी नतर सांगितले.

Exit mobile version