Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी किरण पाटील यांची निवड

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मोहराळा येथील युवा सामाजिक  कार्यकर्ते यांची युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद भैया पाटील,माजी मंत्री गुलाबराव देवकर,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी नियुक्ती पत्राव्दारे मोहराळा तालुका यावल येथील  किरण गोपाळ पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड  केली.

यावेळी युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, राष्ट्रवादी युवकचे यावल तालुकाध्यक्ष पवन पाटील, राष्ट्रवादी आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी,बाजार समिती संचालक डॉ. अरुण पाटील उपस्थित होते. किरण पाटील हे मोहराळा विकासो चे संचालक असून या आधी त्यांनी युवक तालुका उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे.सहकार क्षेत्रात व पक्ष संघटने मध्ये केलेले त्यांचे कार्य पाहून त्यांना ही बढती मिळाली आहे.

या निवडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, राष्ट्रवादी युवक ता.अध्यक्ष पवन पाटील ,यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील व राकेश कोलते,विजय पाटील,ललित पाटील , युवकचे शहराध्यक्ष हीतेश गजरे,रोहन महाजन,मयूर पाटील ,राजेंद्र महाजन ,ग्रा.प.सदस्य यशवंत पाटील , ऍड निवृत्ती पाटील ,प्रसन्न पाटील, सागर सोनवणे,समाधान पाटील विशाल पाटील,भरत महाजन , गजानन पाटील ,विवेक वारके, विशाल पाटील आदींनी निवडीचे स्वागत केले .

Exit mobile version