पाच विकास सोसायटींची निवडणूक बिनविरोध

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील नगरदेवळा – बाळद या जिल्हा परिषद गटातील ५ विकास सोसायट्यांची निवडणुका येथील जि.प.सदस्य रावसाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून बिनविरोध झाली.

पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या ‘शिवालय’ या निवासस्थानी बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा आमदारांच्या हस्ते पुष्पहार घालून व पेढे भरवून सत्कार करण्यात आला.

तालुक्यातील नगरदेवळा – बाळद गटातील वडगाव (मुलाने) – निपाणे विकास सोसायटी (१३ सदस्य), दिघी विकास सोसायटी (१३ सदस्य), आखतवाडे विकास सोसायटी (१३ सदस्य), वडगाव स्वामीचे (१३ सदस्य), घुसर्डी – होळ विकास सोसायटी (१३ सदस्य) या ५ विकास सोसायट्यांची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली.

Protected Content