Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठा महासंघाच्या जिल्हासंघटकपदी देवेंद्र मराठे यांची निवड

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा संघटक पदी देवेंद्र मराठे यांची निवड करण्यात आली.

 

कै.अण्णासाहेब पाटील यांनी १९८१  साली अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली.  या महासंघाच्या जळगाव जिल्हा संघटकपदी देवेंद्र मराठे यांची एकमताने निवड करण्यात आली. ते विद्यार्थी चळवळीपासून ते युवकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. मराठा समाजामध्ये समाजाचा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा समाजाचे विविध प्रश्न असो यावर  वेळोवेळी आवाज उठवण्याचे काम देवेंद्र मराठे हे करीत आहे.  महासंघाचे प्रमुख अॅड. शशिकांत आप्पा पवार यांनी सामाजिक व राजकीय चळवळीमध्ये काम करीत असलेले त्याच पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कुशल संघटन करून समाजाच्या युवक-युवतींना व बांधवांना एकत्र आणून समाजाचे विविध प्रश्न सोडवण्याचे काम करण्याकरता व समाजाची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उन्नती व्हावी या हेतूने  देवेंद्र मराठे यांची जिल्ह्याच्या संघटकपदी निवड केली.  आज निवडीचे पत्र मराठा महासंघाचे उद्योजक व व्यापारी संघाचे सुदाम पाटील मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. बी. बी. भोसले यांच्या हस्ते जळगाव येथे देण्यात आले.

या निवडीचे अखिल भारतीय  मराठा महासंघ अप्पासाहेब शशिकांत पवार, दिलीप जगताप, महिला राष्ट्रीय अध्यक्ष कविता भोसले, रणजित जगताप युवक अध्यक्ष, मराठा उद्योजक/ व्यापारी महासंघाचे सुदाम पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. बी. बी. भोसले, केतन पाटील, कृष्णा पाटील, भगवान पाटील तसेच जिल्हा भरातील सर्व समाजाचे नेते, व समाज बांधवांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

Exit mobile version