भालोद विकास सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदाची निवड संपन्न  

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील भालोद येथे नुकत्याच पार पडलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपप्रणीत शेतकरी पॅनलने दणदणीत विजय मिळवला होता. आज सर्व नवर्निर्वाचित संचालक मंडळाची बैठक संपन्न होऊन यात भालोद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यात आली.

आज दिनांक २९ मार्च रोजी संपन्न झालेल्या या बैठकीत भालोद येथील प्रगतिशील शेतकरी तथा जेडीसीसी बॅकचे माजी संचालक गणेश नेहेते यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच व्हाईस चेअरमनपदी तुषार पिंपळे यांचीसुद्धा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या सर्वसाधारण बैठकीच्या प्रसंगी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक लीलाधर चौधरी, नारायण चौधरी, नितीन चौधरी, भास्कर पिंपळे, मनोज जावळे, रवींद्र महाजन, सुभाष परतणे, बळीराम कोळी, लीना नेहेते, ललिता महाजन यासह मीनल जावळे मोहन जावळे, गिरीश महाजन, किशोर नेहते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडणूकीच्या संपूर्ण प्रक्रीयेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन.पी.भारंबे यांनी काम पाहिले. संस्थेचे सचिव भागवत कोल्हे, संस्थेचे कर्मचारी दगडू नेहेते, शिवाजी जावळे प्रवीण झांबरे वासुदेव नेहेते यांनी सहकार्य केले.

Protected Content