Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुका सेवादलाच्या अध्यक्षपदी अजय बढे यांची निवड

यावल प्रतिनिधी | यावल तालुका सेवादलाच्या अध्यक्षपदी अजय बढे यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश विलास औताडे यांचे सूचनेवरून सेवा दलाच्या नवीन नियुक्ती करण्यात आली.आ.शिरीष चौधरी, डॉ.उल्हास पाटील, प्रदेश सचिव कोलपकर व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पवार, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, सेवा दलाचे मनीष नेमाडे यांनी यावल येथील अजय रामकृष्ण बढे यांना सेवा दलाचे यावल तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे .

या कार्यक्रमात महानगर अध्यक्ष श्याम तायडे, जिल्हा महिला सेवा दलाच्या अध्यक्षा डॉ.ईश्वरी राठोड, जिल्हा सरचिटणीस शेख जमील, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश बारसे, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगारचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक प्रसन्न देशमुख, प्रल्हाद सोनवणे, गोकुळ चव्हाण, योगिता शुक्ला, सकीना तडवी, छाया कोरडे, अमिना तडवी, पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.

Exit mobile version