Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव मतदार संघात देवकर खर्चात आघाडीवर

sarpancha

जळगाव (प्रतिनिधी ) जळगाव व रावेर मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून गुरुवापर्यंत निवडणूक खर्चात  सर्वाधिक खर्च हा महाआघाडीच्या उमेदवारांनी केले असल्याचे दिसून येत आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी गुरुवार पर्यंत सर्वाधिक म्हणजे ४४ लाख ४३ हजार रुपये खर्च केला आहे. त्यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले सेना-भाजप महायुतीचे उन्मेश पाटील यांचा खर्च ३५ लाख ६४ हजार, तर वंचित बहुजन आघडीच्या उमेदवार अंजली बाविस्कर यांचा खर्च ३ लाख, ३१  हजार रुपये आहे.  संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांनी १ लाख २५ हजार,  मोहन बिऱ्हाडे ७१ हजार,  ईश्वर दयाराम मोये ६९ हजार,  रुपेश संचेती यांनी ४९ हजार, ललित शर्मा ३४ हजार, अनंत महाजन यांनी २९ हजार, शरद भामरे यांनी २६ हजार, ओंकर जाधव यांनी २५ हजार,  मुकेश कुरील २१ हजार, राहुल बनसोडे यांनी १९ हजार तर सुभाष खैरनार यांनी १५ हजार रुपये खर्च केले आहेत.  तर रावेर लोकसभा मतदार संघात महाआघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी गुरुवारपर्यंत ४६ लाख ८० हजार तर महायुतीच्या रक्षा खडसे यांनी ४१ लाख ८७ हजार रुपये खर्च केला आहे. उमेदवारी पत्र दाखल केल्यानंतर उमेदवाराला दैनंदिन खर्चाची माहिती लेखी स्वरूपात ठेवावी लागत असून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना ७० लाखांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा आहे.

 

Exit mobile version