Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद ; निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता

 

मुंबई (वृत्तसंस्था) निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेत आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याआधीच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला होता. त्या बैठकीनंतर त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका दिवाळीच्या अगोदरच घेण्याबाबत सकारात्मक असल्याचे म्हटले होते. आज दुपारी २ वाजेला निवडणूक आयोगाच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान होईल, असाही अंदाज वर्तवला जात आहे. आगामी काळात महाराष्ट्रासह एकूण 3 राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूक तारखा एकाचवेळी जाहीर होतील. तर झारखंडच्या निवडणुकांच्या तारखा नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील, असा अंदाज आहे.

Exit mobile version