Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेला परवानगी देण्यास निवडणूक आयोगाचा नकार

मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या धडाकेबाज प्रचासभांना ब्रेक लागू शकतो. कारण राज ठाकरेंच्या मुंबईमधल्या सभेला निवडणूक आयोगाने परवानगी नाकारली आहे. मनसे लोकसभा निवडणूक लढवत नसल्याचे कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या 24 एप्रिलला होणाऱ्या सभेला परवानगी देण्यास नकार दिला आहे. दरम्यान, मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी मात्र सभेला परवानगी मिळू शकते, असा विश्वास व्यक्त केला आहे.

 

काळा चौकीतील शहीद भगतसिंग मैदानात 24 एप्रिलला मनसेने सभा आयोजित केली आहे. या सभेला परवानगी मिळावी म्हणून 18 एप्रिलला पक्षाने एफ/दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे अर्ज केला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कालावधीत उमेदवारांना विविध परवानग्यांसाठी ‘एक खिडकी योजनें’तर्गत अर्ज करणे आवश्यक असते. या नियमानुसार मनसेचा अर्ज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील एक खिडकी योजनेच्या समन्वय अधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी पाठवण्यात आला होता. मनसे निवडणूक लढवत नसल्याचे कारण देत समन्वय अधिकाऱ्यांनी सभेला परवानगी नाकारली.

Exit mobile version