साध्वी प्रज्ञावर कारवाईचे संकेत

नवी दिल्ली वृत्तसंस्था । नथूराम गोडसे याची स्तुती करणार्‍या साध्वी प्रज्ञा यांनी या प्रकरणी माफी मागितली असली तरी त्यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी असल्याचे वक्तव्य केले होते. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील, असे विधान केले होते. त्यानंतर वादास तोंड फुटले होते. यानंतर प्रचंड वादंग झाले. भाजपने यापासून सुरक्षीत अंतर राखले होते. यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी लागलीच याबाबत माफी मागितली होती. तथापि, त्यांनी या प्रकरणी माफी मागितली असली तरी त्यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करू शकतो. मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपल्या अहवालामध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर कारवाईची शिफारस केल्याची माहिती आता समोर आली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त टिप्पणीमुळे निवडणुकीदरम्यान अशांतता निर्माण होऊ शकते, असे मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपल्या अहवालात नमूद केल्याचे वृत्त आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Add Comment

Protected Content