Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निवडणुकीची रणधुमाळी सुरु ; याद्या देण्यास दिरंगाई

रावेर प्रतिनिधी । रावेर कृषी उपन्न बाजार समितीची निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सहायक निबंधकांकडून मतदार याद्या मागविल्या जात आहे. ग्राम पंचायत मतदारसंघाची यादी निश्चित करण्यासाठी गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांना तालुक्यातील सदस्याची नावे मागितले होते. परंतु अद्याप पंचायत समितीकडून याद्या देण्यात आल्या नसुन दिरंगाई सुरु आहे.

रावेर कृषी उपन्न बाजार समितीची निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून याद्या निश्चित करण्यासाठी विविध कार्याकारी सोसायटी सदस्यांची मतदार म्हणून नावे तसेच हमाल-मापाडी मतदरांची नावे सहायक निबंधक कार्यालयात प्राप्त झाले आहे. तर ग्राम पंचायत मतदारसंघातील चार उमेदवार येतात यांना मतदार म्हणून ग्राम पंचायत सदस्य मतदान करतात याद्या जमा करण्याची आज शेवटची तारीख होती. परंतु पंचायत समिती कडून अद्याप ग्राम पंचायत सदस्याच्या याद्या दिल्या गेल्या नाही. सहायक निबंधकांनी दि.१४ रोजी याद्या संदर्भात पत्र दिले होते. शेवटची तारीख दि.२२ होती. परंतु अद्याप ग्राम पंचायत मतदार संघासाठी याद्या मिळाले नसल्याचे निबंधक कार्यालया कडून सांगण्यात आले.

 

Exit mobile version