Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कौटुंबिक वादातून वृद्ध महिलेला शिवीगाळ करत मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात कौटुंबिक वादातून वृद्ध महिलेला मारहाण करून धान्य मोजण्याचे माप फेकून मारल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विमलबाई शहादु शेकोकारे (वय-६०, रा. इंदिरानगर, ममुराबाद) या वृद्ध महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता घरातील अश्विनी विजय शेकोकारे यांच्यात त्यांचे कौटुंबिक वाद होऊन भांडण झाले. या रागातून अश्विनी शेकोकारे या महिलेने वृद्ध महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच घरात असलेले धान्य मोजण्याचे लोखंडी माप फेकून मारल्याने वृद्ध महिलेच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली. जखमी झालेल्या वृद्ध महिलेला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेबाबत सोमवारी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मारहाण करणाऱ्या अश्विनी विजय शेकोकारे यांच्यावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास शिंदे करीत आहे.

 

Exit mobile version