Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकीच्या धडकेत पायी जाणाारे वृध्द जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कानळदा रोडवरील के.सी. पार्क समोरून पायी जात असलेल्या ७० वर्षीय वृध्दाला दुचाकीने धडक देऊन जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी दुचाकीधारकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक बारकू माने (वय-७०) रा.धुळे हे कामाच्या निमित्ताने रविवार २ जुलै रोजीसायंकाळी सात वाजता जळगाव शहराजवळील कानळदा रोड वरून पायी जात होते. शहरातील के.सी. पार्क जवळ पायी जात असताना दुचाकी (एमएच १८ आर २३८०) वरील दुचाकीधारक विकी भोई रा. आव्हाने ता.जि. जळगाव याने वृद्ध अशोक माने यांना जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले, त्यांना खाजगी वाहनाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. याप्रकरणी अशोक माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी ६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता दुचाकीधारक विकी भोई याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे करीत आहे.

Exit mobile version