Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोढरे येथून वयोवृद्धा बेपत्ता

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | घरच्यांना शेतात जाऊन येतो असे सांगून गेलेला वयोवृद्ध व्यक्ती बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील बोढरे येथे उघडकीला आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील बोढरे येथील शेतकरी राजधर वामन केदार (वय-६०) हे २ डिसेंबर रोजी पहाटे सकाळी ५ वाजताच्या सुमारास घरच्यांना शेतात जाऊन येतो असे सांगून गेला. परंतु तो घरी परतला नाही. त्यावर घरच्यांनी त्यांचा परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध केली. परंतु तो आजपावेतो मिळून आला नाही. म्हणून घरच्यांना हरवल्याची खात्री झाल्यावर मुलगा विनोद राजधर केदार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात हरवल्याबाबत नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version