Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अयोध्या नगरातील वृध्दाची मेहरूण तलावात आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । अयोध्या नगरात राहणाऱ्या ६२ वर्षीय वयोवृध्दाने मेहरूण तलावात उडी घेवून आत्महत्या केल्याचे आज दुपारी उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोटन पितांबर चौधरी असे मयत वृध्दाचे नाव आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, लोटन चौधरी हे आपल्या पत्नी व चार मुलांसह शहरातील आयोध्यानगरात वास्तव्याला आहेत. त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे.  आज सकाळी घरात काहीही न सांगता ते घरातून निघून गेले होते. शहरातील मेहरूण तलवात त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी असीत तडवी व योगेश बारी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. तलावातून मृतदेह काढून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे. मयताच्या पत्नी, पश्चात चार मुले, तीन मुली, सुना, जावाई आणि नातवंडे असा परिवार आहे. 

Exit mobile version