Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकीच्या धडकेत वृध्द जखमी; रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील डीएसपी चौकातील भाऊंचे उद्यानाजवळ पायी जात असलेल्या वृद्धाला मागून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी वाजता घडली. या धडकेत वृद्ध जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कोदर मूलचंद बंजारा वय 66 रा. महाबळ रोड, महाबळ पोलीस चौकी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते डीएसपी चौकातील भाऊंचे उद्यानाजवळून पाय जात होते. त्यावेळी मागून दुचाकीवर येणारा महिपाल धर्मपाल जांगिड रा. रविराज कॉलनी, जळगाव याने दुचाकीने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत वृद्धाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वृद्धांने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दुचाकीधारक महिपाल धर्मपाल जांगिड यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.

Exit mobile version