Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘तो’ चाकू हल्ला एकतर्फी प्रेमातून ( व्हिडीओ )

bodwad

बोदवड प्रतिनिधी । येथील आयटीआयमध्ये आज सकाळी शिक्षिकेवर झालेला चाकू हल्ला हा एकतर्फी प्रेमातून झाल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत वृत्त असे की, आज सकाळी येथील आयटीआयमधील शिक्षिकेवर तेथीलच शिक्षकाने चाकू हल्ला करून नंतर स्वत:वर वार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. हा सर्व प्रकार संबंधीत शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमातून घडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत जखमी शिक्षिकेच्या पतीकडून मिळालेली माहिती अशी की, चंदा उमेश गरकळ ( वय ३२ ) या बोदवड येथील आयटीआयमध्ये दीड वर्षांपासून नोकरीला आहेत. त्याच महाविद्यालयात के.ई पाटील हा शिक्षकदेखील कामाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तो चंदा गरकळ यांना व्हाटसअ‍ॅप आणि फेसबुकवर अश्‍लील मॅसेज पाठवत होता. मात्र त्यांनी या मॅसेजला कुठलाही प्रतिसाद न देता महाविद्यालयाच्या वरिष्ठांकडे यासंदर्भात तक्रार दिली होती. तथापि, आयटीआयचे संचालक मंडळ आणि प्राचार्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते.

दरम्यान, आज सकाळी महाराष्ट्र एक्सप्रेस उशिरा आल्याने आयटीआयमधील कर्मचारी उशिरा आले. ही संधी साधत चंदा गडकळ यांना एकटे पाहून के. ई. पाटील यांनी एका वर्गाचा दरवाजा बंद करत त्यांनी धारदार शस्त्राने पोटावर तोंडावर हातावर वार करत त्यांना गंभीर जखमी केले. हा प्रकार आयटीआय महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने बोदवड येथील रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. तर, यानंतर पाटील याने स्वत:वर वार केल्याने तोदेखील जखमी झाला आहे. त्यालाही रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पहा : बोदवड येथील थरारक घटनेबाबत संबंधीत शिक्षिकेच्या पतीने दिलेली माहिती.

 

Exit mobile version