Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट ; राजकीय चर्चेला उधाण

khadse pawar1
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी आज (सोमवार) दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्यामुळे राजकीय चर्चेला उधान आले आहे.

 

शरद पवारांच्या ६ जनपथ निवासस्थानी दोघांमध्ये नेमकी कार्य चर्चा झाली ते समजू शकलेले नाही. एकनाथ खडसे भाजपामध्ये नाराज असून वेळोवेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. एकनाथ खडसे हे भाजपा नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत आल्याची चर्चा होती. पण त्याऐवजी ते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. दरम्यान, ते पक्ष सोडणार असल्याचीही चर्चा रंगू लागली. पण त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. शरद पवार यांच्याशी माझे जुने संबंध आहेत. त्यांना भेटायचे असले तर मी जाऊ शकतो असे विधान, खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना केले आहे.

Exit mobile version