Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकनाथराव खडसे ‘इन अ‍ॅक्शन’ : मोदींविरूध्दचे ट्विट केले रिट्विट !

मुंबई प्रतिनिधी । भाजपचे मातब्बर नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज भाजप विरूध्द पहिला हल्लाबोल करतांना थेट मोदींवर टिका करणारे जयंत पाटील यांचे ट्विट हे रिट्वीट केले आहे.

एकनाथराव खडसे हे भाजपचा त्याग करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ते लवकरच राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. आजवर त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कंपूवर हल्लाबोल करतांना भाजप आणि पक्षाचे नेतृत्व यांना मात्र कधीही लक्ष्य केले नव्हते. मात्र आता त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींवर टिका करणारे ट्विट हे रिट्वीट करून आपले इरादे जाहीर केले आहेत.

या माध्यमातून एकनाथराव खडसे यांनी अप्रत्यक्षपणे थेट मोदींवरच टिका केल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता खडसे यांच्या रिट्विटची चर्चा सुरू झाली आहे. विशेष करून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याआधी त्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्या विरूध्दचे रिट्विट केल्याने ते आता भाजप विरूध्द अतिशय आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ताजे अपडेट : एकनाथराव खडसे यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून जयंत पाटील यांनी मोदींवर टिका केलेले रिट्वीट रात्री दहाच्या सुमारास करण्यात आले. यावरून आज सकाळी प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्वण सुरू झाले. परिणामी सकाळी सव्वानऊच्या सुमारास हे रिट्वीट डिलीट करण्यात आले. पण बहुतेक युजर्सनी याचा स्क्रीन शॉट काढून ठेवलेला होता. तो खालील प्रमाणे आहे.

Exit mobile version