एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४१ आमदार आणि १२ खासदार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राजकीय वर्तूळात सस्पेन्स वाढत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सोबत असलेले सर्व आमदार गुवाहटीला पोहचल्यानंतर जवळपास ४१ आमदार आणि १२ खासदार सोबत असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठे भागदड पडले आहे. महाराष्ट्री राजकीय वातावरण कसं राहणार याची उत्सुकता लागून आहे.

 

दरम्यान, बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावरून मातोश्री कडे जाण्यास प्रस्थान केले आहे. दरम्यान, एखाद्या शिवसेना आमदाराने सांगाव की राजीनामा द्या मुख्यमंत्रीसह शिवसेना प्रमुखपदही सोडतो असे ठाकरे यांनी सांगितले आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनाला मोठा धक्काच बसला आहे. आमदारांच्या बंडखोरी नंतर आता शिवसेनेचे १८ खासदारांपैकी १२ खासदार देखील शिंदे गटाला जाण्याची शक्यता असल्याचे वर्तविण्यात येत आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला यश आलं आल्याचं दिसतंय. सेनेचे जवळपास ४१ आमदार शिंदे गटात सामील झाल्याचं कळतंय. मुंबई, खान्देश, कोकण आणि मराठवाड्यातील मोठं संख्याबळ एकत्र करण्यात शिंदेंचा प्लॅन यशस्वी झालाय. आता ठाकरे यांना सहकार्य करणारे फक्त १४ आमदार उरले आहेत.

Protected Content