Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकनाथ शिंदेंना शिवसेना गटनेते पदावरून हटविले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे शिंदे यांची मानधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू असतांना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्यात आले.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांनी नेमणूक करण्यात आली आहे. अजय चौधरी हे शिवसेना शिवडी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार असून निष्ठावंत शिवसैनिक आहेत.

महाविकास आघाडीत आमची घुसमट होत असून काँग्रेस व राष्ट्रवादीसोबतचे सरकार आम्हाला मान्य नाही, भाजपा सोबत सरकार स्थान केलं जावे यात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद द्यावे आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद द्यावे, असा निरोप देण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेतील या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठा भूकंप झाला असून आमदारांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आता एकनाथ शिंदेंना शिवसेनेच्या गटनेते पदावरुन हटविण्यात आाले असून त्यांच्या जागी शिवसेनेच्या गटनेतेपदी शिवसेना शिवडी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार अजय चौधरी यांनी नेमणूक करण्यात आली आहे.

Exit mobile version