Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिंदे यांचे पुढील टार्गेट ‘शिवसेना भवन’ ? : लवकरच दावा करण्याची शक्यता

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आधी शिवसेनेचे आमदार फोडून सत्तारूढ झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आता खासदारांवरही लक्ष केंद्रीत केले आहे. यासोबत आता शिंदे गट थेट शिवसेना भवनावर देखील दावा करण्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळाच चर्चेला उधाण आले आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीत असून ते खासदारांच्या नव्या गटाची मान्यता मिळवण्यासाठी पंतप्रधान व लोकसभा सभापतींना भेटणार आहेत. यानंतर ते खासदारांसह दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. एकीकडे या घडामोडी घडत असतांना आता शिंदे गटातर्फे थेट शिवसेना भवनावर दावा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात झी-२४ तास वा वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे.

या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचं पुढचं लक्ष्य शिवसेना भवनवर ताबा करण्याचं असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दादर येथे शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन आहे. स्वत:चीच शिवसेना मूळ शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाचा आहे. याचाच दाखला देत शिवसेना भवनाची मालकी ही आपल्याकडे असावी असा दावा एकनाथ शिंदे करणार असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. या वृत्ताला शिंदे गटाने दुजोरा दिला नसून शिवसेनेकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Exit mobile version