Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भडगावात एकनाथ खडसेंच्या प्रतिमेला ‘जोडे मार’ आंदोलन !

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ भडगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज एकनाथ खडसे यांचे पोस्टरला पाचोरा भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत आमदार एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याच्या निषेध करण्यात आला. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी भडगाव तालुका नवनियुक्त तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नूतन पाटील, जिल्हाचिटणीस प्रमोद पाटील, अनिल पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किरण शिंपी, शहर अध्यक्ष बन्सीलाल परदेशी, युवा मोर्चा शहराध्यक्ष विशाल चौधरी , जगदीश पाटील , तांदूळवाडी सरपंच नकुल पाटील, नामदेव मालचे, भाजप व्यापारी आघाडी अध्यक्ष विजय अलई, मुन्ना परदेशी, कुणाल पाटील, विश्वनाथ भोई, प्रदीप कोळी, भूषण पाटील, अमोल सोनार, राहुल देशमुख , निखिल कासार, योगेश शेलार, मनोहर पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version